प्रतिनिधी- विकास म्हस्के ,गाव – गोगलगाव ता -राहाता जि – अहिल्यानगर.
गोगलगाव मुक्कामी दिंडीत वारकऱ्यांची संख्या अंदाजे 40 ते 50 हजार भाविक असल्याची दिंडीचे प्रशासनाने कळवलेली होते.
पालखीचा स्वागतासाठी गोगलगावचे सरपंच ,उपसरपंच व सर्व सदस्य वर्ग व ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ग्रामस्थ यांनी गोगलगावमध्ये फटाक्याची वाजवून जेसीबीने फुले ,पुष्पहार अर्पण करून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले महिलांनी पूजन करून दर्शन घेतले संध्याकाळी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था गायकर पाटील कुटुंबीयांनी केली.
गोगलगावातील सर्व ग्रामस्थांनी सक्रिय होऊन छोटे ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन युवकांनी वाढण्यासाठी मदत केली गेली ,गोगलगाव गावकऱ्यांच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून प्रशासनाच्या सहकार्याने दिंडीची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये वाटप मंडप स्वागत कमान टॉयलेट साठी सोय ठीक ठिकाणी लाईट व मंडप ची व्यवस्था बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर, मदतनीस उपस्थित या वारकऱ्यांचे व्यवस्था करण्यास आलेली होती यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक या दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले . गोगलगाव ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य गोगलगाव सोसायटीचे चेअरमन, वाय चेअरमन व सदस्य गावातील युवक, भजनी मंडळ ,महिला यांनी मदत केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मा.राधाकृष्ण विखे पाटील व दक्षिण अहिल्यानगरचे मा.खा.डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीचे जिल्हाधिकारी अहिल्यानगर,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी गोगलगाव येथे समक्ष पाहणी केली.
दिंडीत मुक्कामी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंडितराव वाघिरे साहेब ,विस्ताराधिकारी सुनील माळी साहेब,उपअभियंता बांधकाम मनोत साहेब,आरोग्य अधिकारी घोलप साहेब गोगलगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्रीमती नवले मॅडम, सरपंच भाऊसाहेब खाडे अलर्ट राहून प्रशासनाला वेळोवेळी कळविण्यात आले.
या भव्यदिव्य पालखी सोहळ्यासाठी विखे कुटुंबियाच्या वतीने डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या धर्मपत्नी धनश्री ताई यांनी भेट देऊन वारकऱ्यांचे व गावाचे आभार मानले.






















