कोल्हार, ता. 05/07/2025 :
आषाढी एकादशी निमित्ताने पंढरीच्या विठुरायाचा जागर युरोपमध्ये घुमतो आहे. पांडुरंगाच्या पादुकांचे तिथे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ७० दिवसांच्या वारीने दोन खंड व २२ देशांतून प्रवास केला आणि वारी शेवटचा टप्पा असलेल्या लंडनच्या टॉवर ब्रिजजवळ पोहोचली एव सांगता झाली. लंडनच्या रस्त्यावरील गर्दीने दाखवून दिले आहे की आपला महाराष्ट्र हा फक्त चौघांचा आहे. पंढरपूरचे विठोबा, आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा आणि स्वराज्याचे शिवबा. लंडनचे ऋषिकेश गाढे मराठी मंडळ स्थानिक मराठी जनतेचा उत्स्फूर्त सहभाग तेथे मिळाला. अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून वारीची योजना साकार झाली.
कोल्हार (ता. राहाता) येथील विठ्ठलभक्त *ऋषिकेश संपत गाढे* यांचे त्यात सक्रिय योगदान आहे. ते सॉफ्टवेअर इंजिनियर असून सध्या ब्रुनल युनिव्हर्सिटी लंडन येथे डेटा सायन्समध्ये मास्टर्स करीत आहेत. सॉफ्टवेअर अॅनेलिसिस पदावर कार्यरत लंडनमधील शिवजयंती दिवाळी व सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा विशेष सहभाग असतो. ज्या देशांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं त्या देशाच्या राजधानीत आपला भगवा अभिमानाने फडकत आहे. याचे अनेक भारतीय साक्षीदार ठरले. गाढे हे त्यापैकी एक आहेत.





पंढरपूर लंडनमध्ये आले आणि भक्तीची वारी टॉवर ब्रिजवर पोहोचली. श्रद्धेने व आनंदाने या क्षणाची खूप दिवसापासून वाट पाहिली होती. पादुका पाहताच तेथील हरिभक्तांचे डोळे भरून आले. ढोलताशा, नाचणे,घुमणे, तसेच भगव्या झेंड्यांनी आकाश व्यापले.” सुखी तोची एक हरी रंगे नाचे” असा जल्लोष केला जात होता. विठ्ठल भक्त तल्लीन होऊन नाचत होते. फुगड्या खेळत होते. चंद्रभागेपासून सुरू झालेला प्रवास एम्स नदीवर आला.














