
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख जितेंद्र जाधव यांची शिवसेना सोशल मीडिया अहिल्यानगर जिल्हा प्रमुख पदी निवड झाली आहे शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आदेशान्वये सोशल मीडिया सेलचे राज्य प्रमुख राहुल कनाल व उपराज्यप्रमुख प्रतीक शर्मा समन्वयक मयूर मगर यांनी जितेंद्र जाधव यांना निवडीचे पत्र दिले आहे
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे माध्यमातून शेकडो रुग्णांना मदतीचा हात देणारे निष्ठावान व कर्तव्यदक्ष शिवसैनिक जितेंद्र जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र जाधव यांच्यावर सोशल मीडिया अहिल्यानगर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे शिवसेना सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा व शिवसेना समन्वयक मयूर मगर यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र जाधव यांना प्राप्त झाले आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा प्रमुख म्हणून कार्यभार करताना विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचे कारकिर्दीत जितेंद्र जाधव यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना जवळपास बारा कोटी रुपयांची वैद्यकीय मदत मिळवून दिलेली आहे या मदत कार्याबद्दल त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता जितेंद्र जाधव हे बालपणा पासूनचे निष्ठावान शिवसैनिक आहेत नुकतेच त्यांनी स्वतःच्या रक्ताचे थेंबातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रेखाटलेले तैलचित्र त्यांना संगमनेर दौऱ्या प्रसंगी भेट दिले होते सोशल मीडिया सेलच्या अहिल्यानगर जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना जितेंद्र जाधव म्हणाले की मी बालपणापासून शिवसेना पक्षावर अत्यंत प्रेम करतोय माझी शिवसेनाप्रमुख व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपारनिष्ठा आहे प्रत्येक कार्यकर्त्याला शिवसैनिकाला प्रेम व मोठे पाठबळ उपमुख्यमंत्री शिंदे देत असतात त्यांच्या कृपाशीर्वादाने व पाठबळाने मी वैद्यकीय मदत कक्षाचे माध्यमातून शेकडो रुग्णांना मदत करून नवजीवन अर्थात जीवदान प्राप्त करून देऊ शकलो याचे मला मनस्वी फार मोठे समाधान लाभले आहे पक्ष नेतृत्वाने सोशल मीडिया सेलच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केलेबद्दल पक्ष नेतृत्वासह सर्वांचा मी ऋणी आहे पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिक व समर्थपणे सांभाळून सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे सरकार दरबारीचे महत्त्वपूर्ण निर्णय जनहिताच्या लोककल्याणकारी योजना शिवसेना पक्षाचे आचार विचार धोरण व व्हिजन घराघरात व माणसा माणसात पोहोचवून शिवसेना पक्षाशी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जोडण्यासाठी पक्षाला शहर व ग्राम पातळीवर अधिक बळकटी प्राप्त करून देणे साठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया अहिल्यानगर सोशल मीडिया सेलचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जाधव यांनी दिली.















