राहता तालुक्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रात दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची लगबग, गर्दी पाहता प्रमाणपत्र प्रक्रियेस विलंब??
दहावी, बारावी, पदवीनिकालानंतर विविध अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र, दाखल्यांसाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ सुरू आहे.
राहता तालुक्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रात दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची लगबग, गर्दी पाहता प्रमाणपत्र प्रक्रियेस विलंब?
दहावी, बारावी, पदवीनिकालानंतर विविध अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र, दाखल्यांसाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ सुरू आहे.
अर्जांची संख्या पाहता वेळेत प्रमाणपत्र मिळेल का असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना सतावतो आहे.
VN Channel प्रतिनिधी : विकास म्हस्के.
दहावी, बारावी, पदवीनिकालानंतर विविध अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र, दाखल्यांसाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ सुरू आहे. सेतू सुविधा केंद्रावर विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. अर्जांची संख्या पाहता प्रवेशप्रक्रियेत वेळेत प्रमाणपत्र मिळते का? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना सतावतो आहे.
प्रवेशप्रक्रियेकडे पालकांचे लक्ष केंद्रित
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. निकालानंतर अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेकडे पालकांचे लक्ष लागले. विद्यापीठाच्या पातळीवरील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीचीही प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
दाखल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया
विविध परीक्षांच्या निकालानंतर पुढच्या प्रवेशासाठी विविध प्रमाणपत्रे, दाखले आवश्यक असतात. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी किंवा दाखल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया होते. सेतू सुविधा केंद्रातून हे प्रमाणपत्र, दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. प्रवेशप्रक्रियेबाबत विविध प्राधिकरणांकडून आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती दिली जाते. निकालापूर्वी अनेक विद्यार्थी, पालकांकडून प्रमाणपत्र, दाखल्यासाठी प्रक्रिया करण्यात आली. यासह आता निकालानंतर सेतू सुविधा केंद्रावर प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्याची संख्या मोठी आहे.
सेतू केंद्र एक दिवसाला हजारो अर्ज.
रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, डोमेसाइल (अधिवास) प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, शेतकरी प्रमाणपत्र ,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी (ईडब्ल्यूएस), दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र, सैन्य दलातील संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रमाणपत्र अशा अनेक प्रमाणपत्र, दाखल्यांसाठी विद्यार्थी, पालक सेतू सुविधा केंद्र , महाईसेवा केंद्रात गर्दी करीत आहेत. प्रत्येक तहसील कार्यालयात मध्ये प्रत्येक गावामध्ये एक सेतू सुविधा केंद्र, तर जिल्ह्यात महाईसेवा केंद्रांची संख्या जास्त वाढवावी.एका सेतू सुविधा केंद्रात दिवसाला सुमारे ५०० अर्ज येत आहेत. महाईसेवा केंद्राद्वारेही अर्जांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात येते.
तसेच प्रत्येक राहाता तालुक्यात प्रत्येक गावात एक सेतू सुविधा केंद्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे साहेब, मनसे तालुकाध्यक्ष गणेश जाधव,मनविसे जिल्हा अध्यक्ष संकेत लोंढे,मनसे राहता शहर अध्यक्ष विजू मोगले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकास म्हस्के ,मनसेचे शिर्डी शहर अध्यक्ष प्रशांत वाकचौरे, राहता शहराध्यक्ष मनसेचे गणेश गाडेकर, अभी पोकळघट, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष शिर्डी यांच्याकडून होत आहे.
विद्यार्थी, पालकांच्या फेऱ्याविविध प्रमाणपत्र, दाखल्यांसाठी सेती सुविधा केंद्रात विद्यार्थी, पालकांनी अर्ज केले. मात्र, अनेकदा वेळेत प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी असल्याचेही काही पालकांनी सांगितले. अनेकदा प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया करण्याची प्रक्रिया संथगतीने होते. काही वेळा विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची कल्पना नसल्याने प्रक्रियेस विलंब होतो, असेही पालकांनी सांगितले. प्रमाणपत्र, दाखले देण्यासाठी निश्चित वेळापत्रक ठरवण्यात आले. मात्र, अनेकदा प्रमाणपत्रासाठी अडचणी येत आहेत. संबंधित अधिकारी प्रमाणपत्र वितरणावर करण्यास विलंब करीत आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर स्वाक्षरी विलंब लागल्याने प्रमाणपत्रे, दाखले वेळेत मिळाले नसल्याची सेतु केंद्रात चर्चा होत आहे.
याची त्वरित दखल घेऊन मा.जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर ,माननीय प्रांत अधिकारी राहता ,माननीय तहसीलदार साहेब राहता. यांच्याकडे मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे साहेब, मनसे तालुकाध्यक्ष गणेश जाधव, मनविसे जिल्हा अध्यक्ष संकेत लोंढे, मनविसे राहता शहर अध्यक्ष विजू मोगले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकास म्हस्के ,मनसेचे शिर्डी शहर अध्यक्ष प्रशांत वाकचौरे, राहता शहराध्यक्ष मनसेचे गणेश गाडेकर, अभी पोकळघट, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष शिर्डी यांच्याकडून मागणी होत आहे प्रत्येक गावामध्ये सेतू केंद्र द्यावा अशी मागणी होत आहे. जेणेकरून एकाच सेतू केंद्रात विद्यार्थ्यांचा गोंगाट होणार नाही ,अशी मागणी होत आहे.













