प्रतिनिधी : विकास म्हस्के
गोगलगाव ता: राहाता जि: अहिल्यानगर.

आश्वी पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 21/2025 दिनांक 20/06/2025 रोजी दाखल असून यातील अनोळखी मयत याचा दिनांक 18/06/2025 रोजी सकाळी 11:45 वाजता संगमनेर लोणी रोडवर आईसाहेब मंगल कार्यालय समोर अपघात झाल्याने त्यास औषध उपचार करता पीएमटी हॉस्पिटल लोणी येथे दाखल केले असता त्याच्यावर उपचार चालू असताना तो दिनांक 20/06/2025 रोजी पहाटे 2/20 वाजता मयत झाला आहे सदर मयत हा अनोळखी असल्याने त्याचे वर्णन पुढील प्रमाणे अनोळखी इसम वय अंदाजे 45 वर्ष शरीराने मध्यम रंगाने सावळा उंची पाच फूट सात इंच चेहरा उभट डोक्याचे केस काळे वाढलेले नाक सरळ पोटावर तीळ उजव्या हाताच्या दंडावर बदाम चिन्हांमध्ये आर टी असे इंग्रजीत लिहिलेले अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर मनुष्याचे चिन्ह असलेले डिझाईन फुल बायाचा कॉलरवर यूएस सीस 1890 एक्सएल 44 प्रीमियम कॉटन असे लोगो असलेला नेसणेस ब्राऊन रंगाची फुल पॅन्ट फुल पॅन्ट त्यावर फास्टट्रॅक असे इंग्रजी लोगो असलेला सदर मयताचे वर्णन वरील प्रमाणे यातील मयत हा अनोळखी असल्याने मयत व नातेवाईक यांचा शोध आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब व हवलदार पारधी साहेब व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राहता अध्यक्ष विकास म्हस्के व सामाजिक कार्यकर्ते इजि.सौरभ चौधरी ( गोगलगाव) यांच्या मार्फत सदर अनोळखी इसमाचा शोध लागला व त्यांचे बंधू संतोष येळेकर (यवतमाळ) यांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले.













