
सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहास बुधवार 30 जुलै ते 6 ऑगस्ट 2025 या काळात इच्छापूर्ती श्री रामेश्वर देवस्थान गोदावरी तीर श्रीक्षेत्र देवगाव शनी ता.वैजापूर जि छ. संभाजीनगर परिसरात सुरूवात होणार आहे.
अहिल्यानगर, नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील 14 ते 15 लाखापेक्षा जास्त भाविक हरिनाम सप्ताहासाठी दाखल होणार आहेत. भाविकांना आमटी भाकरीचा प्रसाद देण्यात येणार आहे. तर अखंड हरिनामाचा धार्मिक जागर हा सात दिवसांतील खास आकर्षण असतो. वैजापूर तालुक्यातील श्री रामेश्वर देवस्थान गोदावरी तीर श्रीक्षेत्र देवगाव शनी येथे सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन सप्ताह समितीने केले आहे. २०० एकर क्षेत्रावर अखंड हरिनाम सप्ताह पार पडनार आहे. यासाठी भव्य प्रहरा मंडप उभारण्यात येणारआहे. या प्रहरा मंडपात अखंड भजनाचे सुर घूमनार आहेत. ८ ते १० हजार टाळकरी चार प्रहरात उभे राहून हरिनामाचा गजर करनार आहेत. याठिकाणी १६८ तास अखंड भजन चालणार आहे.सप्ताहास भेट देणाऱ्या भाविकांसाठी भव्य कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे या सप्ताह काळात २५ ते ३० लाख भाविक भेट देतील असे गृहित धरुन हिंदुधर्म रक्षक गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज,मठाधिपती गोदाधाम सरला बेट यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महंत रामगिरी महाराज यांची भव्य मिरवणूक काढून सप्ताहास सुरवात होणार आहे.















