राहाता (जि. अहिल्यानगर) ; गोगलगाव विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राधाकृष्ण विखे पाटील साहेब गटाचे चंद्रभान गेणुजी चौधरी यांची तर व्हा चेअरमन पदी गंगुबाई भाऊसाहेब मगर यांची आज शुक्रवार दि. 25 जुलै 2025 रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
गोगलगाव येथील सहाय्य निबंधक- नामदेव ठोंबळ कार्यालयात सोसायटीचे तत्कालीन चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रिक्त जागेसाठी चेअरमन पदी श्री.चंद्रभान गेणुजी चौधरी यांची तर व्हा. चेअरमन पदी गंगुबाई भाऊसाहेब मगर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन पदासाठी सूचक म्हणून माणिक रामभाऊ गोर्डे यांनी तर अनुमोदक म्हणून सुदाम तुकाराम अनारसे यांनी स्वाक्षरी केली .तर व्हॉइस चेअरमन पदासाठी सुचक म्हणून निवृत्ती रामभाऊ पांढरकर यांनी तर अनुमोदक म्हणून श्रीमती.रहीबाई चांगदेव पडवळ यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी संचालक नानासाहेब नामदेव गायकर, माणिक रामभाऊ गोर्डे, तानाजी शिवनाथ मगर, ज्ञानदेव विठ्ठल मगर, निवृत्ती रामभाऊ पांढरकर, बाळासाहेब दगडू गुळवे, मारुती कृष्णा ठोके, मुरलीधर तुकाराम दुशिंग, सुदाम तुकाराम अनारसे,बबन रुंजा खाडे, तज्ञ सदस्य संतोष कारभारी माघाडे, स्वीकृत सदस्य मोहन भास्कर पानसरे. आदींसह सचिव दत्तात्रय नामदेव राजभोज उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
























