
राहाता प्रतिनिधी:- विकास म्हस्के
दिनांक १७/०८/२०२५ रोजी नागपूर येथे जिल्हा परिषद अभियंता संघटना यांची त्रैवार्षिक सभा संपन्न झाली. सदर त्रैवार्षिक सभेमध्ये राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यामध्ये जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग राहता येथील प्र.उपअभियंता *श्री मयूर मुनोत* यांची *राज्य उपाध्यक्ष* म्हणून *बिनविरोध* निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषद अहिल्यानगर याचा राज्यात डंका वाजलेला आहे…
नागपूर येथे सभेस जिल्हाध्यक्ष श्री राजू दिघे, जिल्हा सचिव श्री अभिमन्यू क्षीरसागर, कार्याध्यक्ष श्री गणेश सवई, कोषाध्यक्ष श्री शिवाजी महांडुळे, माजी उपाध्यक्ष श्री रामकृष्ण सरोदे, श्री जयेंद्र पट्टे, श्री शेखर लांडगे, श्री योगेश डेरे, श्री महेश मडावी, श्री सचिन दिनकर आदी अभियंता उपस्थित होते…
श्री मुनोत साहेब यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, मा. खासदार श्री सुजय विखे पाटील साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी साहेब, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विजय मुळीक साहेब, कार्यकारी अभियंता श्री बाळासाहेब नन्नवरे, राहता गटविकास अधिकारी श्री विवेक गुंड व जिल्ह्यातील अभियंता यांनी अभिनंदन केले.


















