
*क्षण अभिमानाचा*
आज लंडन येथे लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ‘लोकमत ग्लोबल इकॉनोमिक कन्व्हेन्शन’ २०२५ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरस्कार सोहळ्यात आमचे मार्गदर्शक राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.डॉ.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना लोकमत परिवाराच्या वतीने “कोहिनूर ऑफ इंडिया” हा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष मा. ना.राहुलजी नार्वेकर, लोकमत वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष मा.डॉ.विजयजी दर्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा.खासदार सुनीलजी तटकरे, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.















