
लोणी बुद्रुक परिसरात बिबट्याचा धुमाकूळ…
वन विभागाच्या अधिकारी ”सायलेंट”
प्रतिनिधी: चैतन्य लगड
लोणी बुद्रुक.
दिनांक: 12 जुलै 2025
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील लगडवस्ती, बलिनारायण रोड परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून ग्रामस्थांची झोप उडाली आहे. जंगलात संचार करणारे बिबटे गेल्या काही वर्षापासून नागरी वस्तीत येऊन जनावरे व माणसांना लक्ष्य करत असून शनिवारी रात्री 11.00 च्या सुमारास येथील चैतन्य लगड हे रात्री त्यांच्या शेतातून घरी चाललेले असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर नजर ठेवून हल्ल्याचा डाव होता.
परंतु काही क्षणात त्यांनी आरडाओरड केली असता नागरिकांचा गर्दी होऊन बिबट्याने पळ काढला.
लोणी बुद्रुक येथे लगड वस्ती बळी नारायण रोड या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून या बिबट्याचा संचार चालू आहे. त्या ठिकाणी नागरिकांना शेतात मोटर चालू करण्यासाठी, पाणी शेतात लावण्यासाठी जाणे मुश्किल झालेले आहे, या बिबट्याचा संचार खूप मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने त्या परिसरात भयभीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे त्वरित या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावा अशी नागरिकांची मागणी होत आहे.















