अप्पानंद महाराज मंदिरासमोरील अतिक्रमण त्वरित काढा….. अन्यथा अमर उपोषणाचा इशारा..
उपोषण कर्ते:- सतीश राजेंद्र खाडे व भाविक भक्त गोगलगाव.
गाव-गोगलगाव ता-राहता जि- अहिल्यानगर.
गोगलगाव मध्ये असलेले पुरातन अप्पानंद महाराज मंदिर हे गेल्या पन्नास वर्षापासून या मंदिराची स्थापना झालेली आहे. या मंदिरामध्ये दर्शनासाठी गावातील अनेक भाविक भक्त व शेजारिल भावी भक्त दर्शनाला येतात. प्रत्येक सालाबाधाप्रमाणे हिंदू संस्कृती च्या सण साजरा करत असतात व त्या मंदिराची पूजा केली जाते व भावीक भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात.
परंतु गेल्या 2 वर्षापासून अपानंद महाराज मंदिरासमोरील बाजूस पूर्व-पश्चिम दिशेस मुरुमाचा व मातीचा ढिगार टाकून मंदिरामध्ये येण्याचा मार्ग बंद केलेला आहे व भाविक भक्तांचे मने दुखावले गेले आहे. तसेच ज्या ठिकाणी मंदिराची स्थापना झालेली आहे, ती जागा गावठाण असून ग्रामपंचायत मालकीची आहे व त्या समोरील बाजूस येण्या-जाण्याचा मार्ग हा गावठाणामध्ये असून ग्रामपंचायतीचा मालकीचा आहे असा सदर दाखला दिनांक 30/09/2024 रोजी ग्रामपंचायत गोगलगाव ने दिलेला आहे व त्या अर्जामध्ये अप्पानंद महाराज मंदिर शेजारील समोरील जागा व परिसर हा गावठाण असून सार्वजनिक आहे तेथे कोणाची वैयक्तिक मालकी नाही, असा दाखला दिला असे ग्रामपंचायतचे लेखी पत्र दिलेले आहे, सबब जागा गावठाण असून ग्रामपंचायत मालकीची जागा आहे तर अतिक्रमणाबाबत प्रशासन कोणाच्या दबाव खाली काम करते की काय? अशी नागरिकांमध्ये व भाविक भक्तांमध्ये चर्चा सुरू आहे.
दिनांक- 23 जुलै 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर, माननीय प्रांत अधिकारी साहेब शिर्डी, मा. तहसीलदार साहेब राहाता, मा. गट विकास अधिकारी साहेब राहाता, मा.पोलीस निरीक्षक लोणी, मा.कामगार तलाठी गोगलगाव व ग्रामपंचायत कार्यालय गोगलगाव. यांना विनंती अर्ज देऊन 10 ते 15 दिवस होऊन आज पावेतो कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही,त्यामुळे भाविक भक्तांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे.
उपोषणकर्त्याच्या प्रमुख मागण्या: –
1) गावठाण ग्रामपंचायत मालकीच्या जागेत केलेले व मंदिराच्या समोरील बाजूस केलेले अतिक्रमण त्वरित हटवावे.
2) आप्पानंद महाराज मंदिराची नोंद ग्रामपंचायती दप्तरी व्हावे.
3) आप्पा नंद महाराज मंदिराची देखभाल दुरुस्ती करावी.
सदरील अतिक्रमण नियमानुसार तातडीने हटवून मंदिरात जाण्यासाठीचा मार्ग सुरळीत करावा, अन्यथा दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी अमरण उपोषण करावे लागेल, अजून 04 दिवस बाकी आहे, तरी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे , कृपया आपण 3-4 दिवसाच्या आतमध्ये सदरील मार्ग हा अतिक्रमण काढून मोकळा करावा , अन्यथा अमरण उपोषण हे अटळ आहे. असे देखील राजेंद्र खाडे व भाविक भक्त गोगलगाव यांनी अल्टीमेटम दिला आहे. उपोषणाला होणाऱ्या परिणामास प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी राहील असे देखील त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
निवेदनावर 70 ते 80 भाविक भक्त / गोगलगावच्या ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षरी आहे.
यामध्ये कैलास भगत खाडे, नामदेव भगत कांदळकर, उद्धव मारुती देवकर, कचरू जगन्नाथ काळे, नानासाहेब उत्तम खाडे, अण्णासाहेब प्रकाश खाडे, नामदेव कारभारी मगर, सोन्याबापू चौधरी, संदीप नवनाथ गुजर, सुभाष दादा दुशिंग, आप्पासाहेब त्रिंबक मगर, मधुकर रामभाऊ कादळकर, सुनील हरदास मगर, सुदाम तुकाराम अनारसे, बाजीराव गंगाधर चौधरी, राधाकृष्ण कुंडलिक गायकर, सुजीबा मुरलीधर कांदळकर, हौशीराम बबन खाडे, रंगनाथ रामनाथ माघाडे, प्रभाकर भागवत पाटील मगर, राजू मुंतोडे, सोपान कारभारी घोडे, धोंडीराम कारभारी खाडे, कारभारी भगत कांदळकर, भागवत गंगाधर गोडे, नाना कारभारी खाडे, अनिल हनुमंता खाडे, गोरख म. घोडे, शांताराम रामभाऊ कांदळकर, संतोष अनारसे,राजेंद्र अशोक तनपुरे, बबन मुरलीधर मगर, भाऊराव कुंडलिक शिंदे, हौशीराम सयाजी चौधरी, त्रिंबक पुंजा चौधरी, विलास रंगनाथ गुळवे, विजय रामचंद्र मगर ,कारभारी दगडू राऊत, सातकर गोकुळ भाऊसाहेब, शिवाजी सूर्यभान पांढरकर, संतोष भास्कर मगर, राजेंद्र ज्ञानदेव गीते, अण्णासाहेब उत्तम खाडे, चांगदेव सुखदेव तनपुरे ,भाऊसाहेब कारभारी कांदळकर, चांगदेव भागवत मुसळे, प्रकाश पु.घोडे, राजू भाऊसाहेब घोडे, योगेश शिवराम दिवटे, भरत विलास काळे ,विक्रम मारुती देवकर, चंद्रकला दगडू खाडे ,नामदेव पुंजा पांढरकर, रामदास दशरथ वैद्य ,सुरेश पूजा ठोके, कमलाकर गणपत कांदळकर, भाऊसाहेब मुरलीधर चौधरी, दत्तात्रय ठकाजी गुजर, ज्ञानदेव विठ्ठल मगर ,प्रदीप संपत दुशिंग ,दीपक गंगाधर चौधरी, बाबासाहेब सयाजी चौधरी ,रामनाथ देवराम भोसले, धोंडीबा कृष्णा गुजर, रवींद्र कानिफनाथ चौधरी, भाऊसाहेब चिमाजी चौधरी, नामदेव रघुनाथ मगर, पांडुरंग जयवंत चौधरी, दामोदर तुकाराम सातकर ,ज्ञानदेव सुखदेव तनपुरे, अण्णासाहेब भानुदास मगर, दत्तात्रय जयवंत चौधरी आदींची नावे असून सह्या आहेत.
अप्पानंद महाराज मंदिरासमोरील मार्ग






















